कौतुकास्पद | निगुडे नं १ च्या वैभवीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Edited by: भगवान शेलटे
Published on: January 05, 2024 19:50 PM
views 185  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निगुडे नं 1 शाळेची विद्यार्थिनी कु. वैभवी बाबाजी गावडे हिने लहानगटात तालुकास्तरीय उंच उडी स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

वैभवी चौथीमध्ये शिक्षण घेत असून प्रतिकूल परिस्थितीतही तिची अभ्यासातील प्रगती व खेळातील प्रगतीदेखील वाखाणण्याजोगी आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका पेडणेकर मॅडम व इतर शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.