कौतुकास्पद | मंगेश कदम यांना शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 23, 2024 13:36 PM
views 225  views

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील खांबाळे येथील प्रयोगशील शेतकरी मंगेश परशुराम कदम यांना सन २०२० सालचा महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. शेती क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कृषी क्षेत्र , फलोत्पादन क्षेञात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. कृषीमंञी धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील शेती क्षेञात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना वेगवेगळे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. यामध्ये श्री कदम यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कृषी आयुक्त कार्यालयामार्फत लवकर पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.