कौतुकास्पद | तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अस्मी मांजरेकर प्रथम

Edited by: भगवान शेलटे
Published on: December 03, 2023 18:55 PM
views 245  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पंचायत समिती शिक्षण विभाग सावंतवाडी तर्फे कलंबिस्त हायस्कूल येथे आयोजित केलेल्या ५१ व्या सावंतवाडी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या प्राथमिक गटातील वक्तृत्व स्पर्धेत आरपीडी हायस्कूल सावंतवाडीच्या अस्मी प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अस्मिला सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका प्रा. सुषमा मांजरेकर तसेच प्रशालेच्या शिक्षिका स्वरा शिरोडकर - सावळ , सौ तोंडवळकर व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. बदलत्या हवामानाचा पर्यावरणावर झालेले परिणाम या विषयावर ७ मिनिटे तिने भाषण केले. स्पर्धेचे परीक्षण सौ पी पी सावंत, रमेश गावडे यांनी तर किशोर वालावलकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.यापूर्वीही अनेक स्पर्धेत अस्मिने पारितोषिके पटकावली आहेत.गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग काकतकर, महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रा. सुषमा मांजरेकर, जिल्हा शिक्षक पतपेढी चेअरमन नारायण नाईक आदींच्या हस्ते तिला पारितोषिक प्रदान करण्यात आले. तिच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही बी नाईक, स्कूल कमिटी चेअरमन डॉ दिनेश नागवेकर, सर्व पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक दिनेश धोंड, उपमुख्यद्यापक पी एम सावंत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.