आदित्य ठाकरेंचं वैभव नाईकांच्या निवासस्थानी जंगी स्वागत

Edited by: भरत केसरकर - उमेश बुचडे
Published on: May 04, 2024 14:20 PM
views 254  views

सिंधुदुर्ग : इंडिया - महाविकास आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सावंतवाडी येथे थोड्याच वेळात भव्य जाहीर प्रचार सभा होणार आहे. आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले असून आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांनी त्यांचे औक्षण करत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आ. वैभव नाईक यांची  मुलगी नंदिनी नाईक, मुलगा राजवर्धन नाईक व शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.यावेळी शिवसेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.