आडेली रोगनिदान - चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by:
Published on: April 13, 2025 17:42 PM
views 116  views

सावंतवाडी : येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि आडेली येथील श्री सोमेश्वर शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने आडेली गावात रविवारी आयोजित  करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी गावात निःशुल्क निदान व चिकित्सा सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल आडेली ग्रामस्थांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या आरोग्य सेवेच्या उपक्रमाचे कौतुक करीत सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले.

आडेली गावचे ग्रामदैवत श्री सोमेश्वर मंदिराच्या सभामंडपात घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्द्घाटन सावंतवाडीच्या जिवनरक्षा हॉस्पिटलचे डॉ शंकर सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुमित्र प्रतिष्ठानचे डॉ. प्रविणकुमार ठाकरे, नेत्र रोग तज्ञ डॉ. विशाल पाटील, स्त्रि रोग तज्ञ  डॉ अंकिता मसुरकर, डॉ सौ मुग्धा ठाकरे, डॉ गौरव घुर्ये, डॉ राहुल गवाणकर, माणगांवच्या परब हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ चेतन परब, डॉ स्वप्निल परब, निवृत्त शिक्षक आत्माराम बागलकर, श्री सोमेश्वर शेतकरी गटाचे अध्यक्ष प्रशांत धर्णे, सचिव सचिन दाभोलकर, सुरेश धर्णे, उदय आगलावे, निवृत्त कृषी अधिकारी प्रमोद केळुसकर, अविनाश  तोरसकर आदी उपस्थित होते.

या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, नेत्र रोग तज्ञ डॉ विशाल पाटील, स्त्रि रोग  तज्ञ डॉ अंकिता मसुरकर, डॉ सौ मुग्धा ठाकरे, डॉ. प्रविणकुमार ठाकरे, डॉ. राहुल गवाणकर, डॉ. गौरव घुर्ये, डॉ. स्वप्निल परब, डॉ. चेतन परब यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात रुग्णांची लॅब टेक्निशियन प्रशांत कवठणकर यांनी ब्लड शुगरची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या वैद्यकिय  शिबिरात १५० गरजू रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. या शिबिराचे नियोजन सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते गुरुनाथ राऊळ, अँड्र्यू फर्नांडिस, भगवान रेडकर, संतोष नाईक, आसिफ शेख, रवि जाधव, सुहास धर्णे, दीपक गावकर, सिद्धेश मणेरीकर यांनी केले.