
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील आडेली पेडणेकरवाडी येथे सासरवाडी च्या नर्सरीत माणगाव तळीवाडी येथील तरुण वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे वय ३२ याचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळला होता. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी त्याची पत्नी आणि सासू-सासरे यांना अटक केली होती. त्या तिघांना आज वेंगुर्ले न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने १६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान खूना बाबत या तिघांना विचारले असता आपण खून केला नाही असे या तिघांचे म्हणणे आहे. तसेच शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याचा मृत्यू विजेच्या शॉक मुळे की अन्य काही कारणामुळे हे स्पष्ट होणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी सांगितले. तर मयत सागर याचा मृतदेह मंगळवारी शवविच्छेदना नंतर रात्री नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर माणगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
डिसेंबर मध्ये लग्न झाल्यानंतर काही दिवसापासूनच मयत सागर आणि त्याची पत्नी नूतन या दोघांमध्ये भांडण होत होते. त्यामुळे नूतन ही आडेली येथे वडील शंकर सखाराम गावडे आणि आई पार्वती शंकर गावडे या दोघांसमवेत राहत होती. यावेळी सागर याने अनेक वेळा नूतन हिला आपल्या घरी माणगाव येथे एकत्र राहूया असे सुचविले. मात्र ती तेथे जाण्यास तयार नव्हती त्यामुळे ती आपल्या आई-वडिलांबरोबर आडेली येथे राहत असे.
सागर हा आपल्या पत्नीच्या संपर्कात होता. मात्र वादावादी मुळे या दोघांच्या तक्रारी महिला निवारण केंद्रात सुरू होत्या. मंगळवारी सकाळी आलेली येथील शंकर गावडे यांच्या घराकडील नर्सरीच्या आवारात त्यांचा जावई सागर भगे याचा मृतदेह सापडला. ही बातमी येतात आडेली गावात एकच खळबळ उडाली.
सागर हा सोमवारी मध्यरात्री आपली पत्नी नूतन हिला भेटण्यासाठी दोन मित्रांना घेऊन आडेली येथे आला होता. त्या दोघांना बाजूला उभे करून तो आड मार्गाने नूतन हीच्या घराकडे गेला. परंतु तो पहाटेपर्यंत माघारी परतला नाही. त्यामुळे संशय आल्याने या मित्रांनी सदर बाब माणगाव येथे त्याच्या घरी व ग्रामस्थांना कळविली. त्यानंतर मंगळवारी सकाळी ग्रामस्थांनी वेंगुर्ले पोलिसांसमवेत नूतन हीच्या घरी जाऊन सागर कुठे आहे याची विचारणा केली. त्यावेळी घरातील या तिघांनी आपल्याला माहित नाही असे सांगितले होते. मात्र सर्वांनी आजूबाजूच्या परिसर पाहताना त्यांना घराच्या कंपाऊंडमध्ये सागर याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे त्याचा खून झाला असा आरोप करत ग्रामस्थांनी खुना चा गुन्हा नोंद करून संबंधितांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्र घेतला. त्यामुळे सायंकाळी पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला होता.