
कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे मध्ये नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबईच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबईकर या उपस्थित होत्या.तुळशीचे रोप देवून प्रशालेच्या वतीने त्यांचे स्वागत केले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसन म्हणजे काय व त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली. व्यसनामुळे समाजामध्ये विघातक घटना घडतात म्हणून विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहायला हवे तरच देश प्रगतीपथावर जाऊ शकतो असे सांगितले.
समाजामध्ये असणारे छोटे छोटे घटक व्यसनाधीनता निर्माण करतात.त्यापासून सावध राहिले पाहिजे या विषयी प्रबोधन केले.तसेच विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली व विद्यार्थ्यांच्या हस्ते व्यसनमुक्तीशी बंधन व्यसनांपासून रक्षण असा आशय असलेली राखी बांधून आगळा वेगळा संदेश त्यांनी दिला.मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केल्या बद्दल नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांचे आभार मानले.