आडाळी MIDC साठीचे विद्युत पोल टाकले जातायत शेतात

शेतकरी आक्रमक
Edited by: लवू परब
Published on: February 28, 2025 16:27 PM
views 209  views

दोडामार्ग : आडाळी एमआयडीसीला लागणारी विद्युत वाहिनी दोडामार्ग बांदा मार्गालगत मोरगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनीतून शेतकऱ्यांची परवानगी न घेता विद्युत पोल घातले जात आहे. मोरगाव येथील राहिवाशी समीर चिरमुरे, प्रज्योत पावस्कर, उपसरपंच देऊ पिळणकर यांनी सदरचे मनमानी पद्धतीने सुरु असलेले काम बंद केले. आमच्या जमिनीतून विद्युत पोल घालण्याचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिली. असा जाब विचारत सदरचे काम आम्ही करू देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

        मोरगाव दोडामार्ग बांदा राज्यमार्गावरून आडाळी  एमआयडीसीला वीज वाहिनी नेण्यासाठी मार्गालगत शेतकऱ्यांच्या जमिनीतून संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व कल्पना नदेता किंवा परवानगी नघेता संबंधित ठेकेदार काही स्थानिकांना हाताशी धरून मनमानी कारभार करत आहे. जेसीबीच्या सहाय्याने खड्डे मारून जमिनीत असलेली झाडे काजू यासारखी झाडे तोडून दादागिरी करत असल्याचे चिरमुरे यांनी सांगितले. याविषयीं मोरगाव येथील उपसरपंच देऊ पिळणकर, समीर चिरमुरे, प्रज्योत पावसकर आदी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत खड्डे मारून पोल उभे करणाऱ्या ठेकेदाराला जाब विचारत काम बंद केले. व आमची केलेली नुकसान भरपाई द्यावी. व यापुढे आमच्या जमिनीतून सदर विद्युत पोल घातल्यास याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असा इशारा यावेळी मोरगाव उपसरपंच देऊ पीळणकर, पावसकर, चिरमुरे यांनी दिला आहे.