
दोडामार्ग : आडाळी एमआयडीसी येथे राष्ट्रीय वनौषधी प्रकल्प यावर यासाठी आडाळी सरपंच पराग गांवकर यांनी केलेल्या मागणीची तात्काळ दखल मंत्री दीपक केसरकरांनी घेतली. केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी चर्चा करुन प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली आहे, अशी माहिती केसरकरांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.
आडाळी एमआयडीसी येथे काल शुक्रवारी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्योजकांची भेट दिली. यावेळी सरपंच पराग गांवकर यांनी येथील मंजूर असलेल्या केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय वनौषधी संस्था प्रकल्पाचे काम राखडल्याचे सांगितले. केंद्रीय आयुष मंत्रालय शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे असल्याने आपण व्यक्तिगत लक्ष घालून पाठपुरावा करावा अशी मागणी श्री. गांवकर यांनी केली.
यावेळी मागणीचे निवेदन देण्यात आले. त्याची तात्काळ दखल घेऊन केसरकर यांनी मंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी चर्चा करुन प्रकल्प मार्गी लावण्याबाबत पत्र दिले आहे, अशी माहिती केसरकर यांच्या कार्यालयाकडून गावकर यांना दिली.