
दोडामार्ग : आडाळी एमआयडीसीत मंत्री दीपक केसरकर यांनी उद्योग पायाभूत सुविधा आणल्या नाहीत असे म्हणून प्रचाराचा मुद्दा घेऊन विरोधक प्रचार करत आहेत व नरेंटिव्ह पसरवत आहेत. मग एमआयडीसीत सद्या सुरु असलेली कामे कोणी आणली? रस्ते, पाणी, वीज या सर्व कामांसाठी कोट्यावधि चा निधी दीपक केसरकर यांच्या माध्यमातून याठीकाणी आणला आहे याचा आज शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांनी याची प्रत्यक्ष ठिकाणी जात माहिती दिली.
आडाळी एमआयडीसीला जन्माला घालून आज 15 वर्षे होत आली. या 5 वर्षात खऱ्या अर्थाने याठीकाणी रस्ते, पाणी, वीज यासारख्या पायाभूत सुविधा दीपक केसरकर यांनी आपल्या माध्यमातुन आणल्या आहेत. एमआयडीसी चा प्रचाराचा मुद्दा घेऊन अपप्रचार करणाऱ्यांना माझ एवढंच सांगण आहे की ते स्वतः सत्तेत असताना त्यांनी एमआयडीसी साठी काय केले हे स्वता सांगावे दीपक केसरकर यांना बदनाम करण्यासाठी अपप्रचार करु नये असे तालुकाप्रमुख गणेश प्रासद गवस यांनी सांगितले.
आडाळी एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांचे काम पुर्णत्वास आले आहे. रस्ते, पाणी, वीज या महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध झाल्याचे पाहून त्रेपंन्न उद्योजकांनी नोंदणी देखील केली आहे. येथे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात उद्योग व्यावसाय उभे राहतील. केवळ मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातूनच आडाळी एमआयडीसीला चालना मिळाली आहे. फक्त श्रेय मिळवण्यासाठी ज्यांनी लॉगमार्च हायजॅक केला त्यांनी दीपक केसरकरांचा अप्रचार करू नये. उद्योग आणण्यासाठी त्यांचे किती योगदान आहे हे स्वातः अनुकरण करावे. अशी खरमरीत टिका करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजन तेली यांच्यावर पलटवार केला आहे.
आडाळी एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांचे होत असलेले मजबुतीकरण आणि ही कामे पूर्णत्वाकडे आले असल्याची पोलखोल करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आढळी एमआयडीसीला भेट दिली. यावेळी त्यांनी आडाळी एमआयडीसीच्या पायाभूत सुविधा पूर्णत्वास ऐत असून येणाऱ्या काळात मोठ्या संख्येने उद्योग उभे राहतील असे आश्वासित केले आहे. असे असताना देखील आडाळी एमआयडीसी हा मुद्दा या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुक प्रचाराच्या केंद्रस्थानी असून या मुद्द्यावरून अपप्रचार करण्याचे काम केले जात आहे. लोकांच्या मनात केसरकरांबद्दल या मुद्द्यावरून नकारात्मकता निर्माण करण्याचे काम ते करीत आहेत. केसरकर यांच्या विरोधात अपप्रचार करण्यापूर्वी त्यांनी स्वतः आडाळी एमआयडीसीत उतरून प्रत्यक्षात पाहणी करावी. केसरकर यांच्या प्रयत्नातूनच कोठ्यावधींचा निधी आडाळी एमआयडीसीसाठी उपलब्ध करून दिला आहे. बंधारा, पाण्याची टाकी, विद्युत पावर हाऊस, रस्ते आधी कामे पूर्णत्वास आली आहेत. एमआयडीसीला लागणारे पाणी मुभलक असावे यासाठी दीपक केसरकर यांनी बंधारा मंजूर केला. त्या बांधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच येथे मारण्यात आलेले विहिरीचे देखील काम पूर्ण झाले असून ते पाणी एमआयडीसीत पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत साठवून ठेवण्याचे प्रात्यक्षिक देखील घेण्यात आले आहे. त्याचबरोबर विद्युत सब स्टेशन चे काम शेवटच्या टप्प्यावर आहे. येणाऱ्या काही दिवसातच येथे विद्युत पुरवठा देखील सुरळीत होईल. वाहतुकीच्या दृष्टीने रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून पायाभूत सुविधा पूर्णत्वास आल्या आहेत. विरोधक याच कामावरून करीत असलेल्या टीकेची पोल पोल करण्यासाठी आज कार्यकर्त्यांनी आडाळी एमआयडीसीला भेट देऊन प्रसार माध्यमांसमोर उघड केले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले जोपर्यंत एमआयडीसीच्या पायाभूत सुविधा पूर्ण होत नाही तोपर्यंत एखादा उद्योजक येथे उद्योग उभारण्यास स्पष्टपणे सहमती दर्शविणारा नाही. परंतु, आता अडचण दूर झालेली आहे. पायाभूत सुविधांचे मजबुतीकरण पाहता गेल्या काही दिवसात त्रेपंन्न उद्योजकांनी महामंडळाकडे नोंदणी केली आहे. लवकरात लवकर या एमआयडीसी जागेत दोन मोठे उद्योग उभारले जातील आणि त्यातून आपल्या तालुक्यातील युवकांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होईल. यासाठी दीपक केसरकर यांनी स्वतःच्या प्रयत्नातून काही उद्योजकांना तिथे पाचारण केले होते. त्या उद्योजकांनी सकारात्मकता दर्शविले आहे. केवळ दीपक केसरकर यांच्याच माध्यमातून आडाळी एमआयडीसीच्या पायाभूत सुविधा पूर्णत्वाकडे आल्या आहेत. तर, उद्योजकांचा येथे येऊन उद्योग उभारण्यासाठी दर्शवणारी सकारात्मकता हे केसर करांचे यश आहे. केवळ आपल्या युवकांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांची प्रामाणिकपणे ही धडपड चालू आहे. मात्र, या विषयाचा बागुलबुवा करून विरोधी उमेदवार केसरकरांवर नाहक टीकेचे बोट उचलत आहे. रोजगाराचा विषय लक्षात घेता विरोधकांनी येथील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्याकडून रोजगारासारख्या जिव्हाळ्याच्या विषयाबाबत लोकात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. अशी खरमरीत टीका शिवसेना पदाधिकारी यांनी विरोधी उमेदवार राजन तेली आणि विशाल परब अर्चना घारे यांच्यावर केली आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, युवा तालुकाप्रमुख भगवान गवस, सोशल मीडिया प्रमुख गोपाळ गवस, मनरे विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, संजय गवस, नंदू गावकर, विनायक शेटे आदी उपस्थित होते.
करोडपती विशाल परब यांनी दोडामार्गच्या युवकांना लखपती तरी बनवाव : उपजिल्हा प्रमुख राजू निंबाळकर
अपक्ष उमेदवार विशाल परब हे युवाई वर्गाला सांगात इथल्या तरुणांना रोजगार आणणार वैगरे वैगरे पण विशाल परब स्वतः तुम्ही मोठे करोड पती झालात हे तरी लोकांना सांगा म्हणजे दोडामार्ग तालुक्यातील एक तरी युवक लखपती बनून तुमचा सारखे बाऊन्सर घेऊन फिरतील 10 ते 12 गाड्या या आमच्या तालुक्यात किणी घेऊ शकला नाही तुम्ही जर करोडपती अब्जपती बनू शकता तर आमच्या युवकांना लखपती तरी बनवा एखाद्या युवकाला जरी तुम्ही लखपती बनवल असत ना तर आम्ही तुमच्या प्रचाराला आलो असतो येणाऱ्या कालखंडात तुम्ही अब्जपती झालात त्याच रहस्य तुम्ही दिल पाहिजे. कितीही कोणी अपप्रचार करुदे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकरच निवडून येतील ही काळ्या दगडावरची रेख आहे. असे राजू निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.
दिखावापणा करून काय केले ?
आडाळी कृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या लॉंग मार्च मध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी झाले होते. मात्र, राजन तेली यांनी भाजपचा नावावर आपले अस्तित्व राखण्यासाठी हा लॉंग मार्च हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सरकार विरोधात उभे राहून त्यांनी अनेक आश्वासने दिलीत. मात्र, त्यानंतर ढुंकूनही या एमआयडीसी कडे पाहिले नाही. स्वतः दिखावा करून अकार्यक्षम ठरलेल्या राजन तेली यांना केसरकारांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार पोहोचत नाही.