
सिंधुदुर्गनगरी : पृथ्वी दिन आणि आंतरराष्ट्रीय बियाणे दिनाचे औचित साधून सिंधुदुर्ग जिल्हा वाईल्ड लाईफ कंजर्वेशन सोसायटी ऑफ सिंधुदुर्ग च्या वतीने मुंबई येथे पृथ्वी दिन आणि आंतरराष्ट्रीय बियाणे दिनाचा उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवामध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी वन्यजीव संवर्धनासाठी व उत्स्फूर्त सहभाग नोंदविला सिंधुदुर्ग जिल्ह्यातही 18 मे रोजी पृथ्वी दिन आणि आंतरराष्ट्रीय बियाणे दिनाचा उत्सव साजरा केला जाणार आहे
सिंधुदुर्ग जिल्हा वाईल्ड लाईफ कंजर्वेशन सोसायटी ऑफ सिंधुदुर्ग तसेंच प्राणीशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र बटालियन एनसीसी आर्मी विंग मुंबई बी ग्रुप, सिद्धार्थ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय फोर्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पृथ्वी दिन आणि आंतरराष्ट्रीय बियाणे दिनाचा उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात लेफ्टनंट विशाल नांगरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक वृंदांना आणि एनसीसी कॅरेट्सना कार्यक्रमाचे उद्दिष्ट सांगून प्रेरणा दिली यावेळी विद्यार्थी,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी या सर्वानी बियाणे दान केले तसेंच बियाणे गोळे बनविण्याच्या कार्यशाळेत सहभाग घेतला व वनसवर्धनासाठी आणि पर्यावरण पुरनिर्मितीसाठी बियाणे गोळ्यांचे महत्व अधोरेखित केले
वाईल्ड लाइफ संस्थेचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ सुयश डिकवलकर यांनी जैवविविधतेच्या सरक्षणाबाबत माहिती दिली व मार्गदर्शन केले कार्यक्रमाचा समारोप प्रणिशास्त्र प्राध्यापक निलेश सोष्टे यांनी केले व 18 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाच प्रकारे पृथ्वी दिन व आंतरराष्ट्रीय बियाणे दिन वाईल्ड लाइफ संस्थेकडून साजरा केला जाणार असल्याचे सांगितले