
कुडाळ : राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.कुडाळ शहरातील विराज बांदेकर, प्रथमेश माने, जावेद इक्बाल मेमन यश मडवळ, सूरज राऊळ, रविराज सावंत, कार्तिक केसरकर, ऋग्वेद पारकर यांच्यासह अनेक युवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
कुडाळ शहरातील युवकांनी राष्ट्रवादी (अजित पवार गटात) प्रवेश केल्यानंतर विराज बांदेकर यांची कुडाळ शहर उपाध्यक्ष पदी तर प्रथमेश माने यांची कुडाळ शहर युवक अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तर जावेद इक्बाल मेमन यांची कुडाळ तालुका अल्पसंख्याक सेल अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी पक्षात प्रवेश केलेल्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, कुडाळ तालुकाप्रमुख आर. के. सावंत, सावळाराम अणावकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सर्फराज नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.