वागदेतील एक्टिवा अपघात प्रकरण

पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे व पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांची कारवाई
Edited by: साहिल बागवे
Published on: September 25, 2024 14:00 PM
views 99  views

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर वागदे गावठणवाडी येथील हॉटेल मालवणी समोर गोव्याकडे जाणाऱ्या लेनवर रस्त्याच्या मधोमध पार्किंग करून ठेवलेल्या कंटेनरला एक्टिवा मोटरसायकल धडक बसून दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे २ वाचे सुमारास अपघात झाला होता. या अपघातात मोटार सायकलवरील चालक साहिल संतोष भगत, वय २३ वर्षे, रा- विद्यानगर कणकवली व संकेत नरेंद्र सावंत, वय २४ वर्षे, रा.परबवाडी कणकवली यांचा जागीच मृत्यू झालेला होता. या अपघातानंतर कंटेनर सही चालक अपघाताच्या ठिकाणाहून फरार झाला होता. कणकवली पोलिसांनी धडक कारवाई करत कंटेनरसह त्या चालकाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत वृत्त असे की, अज्ञात कंटेनरचालक हा कंटेनरसह घटनास्थळावरून पळून गेलेला होता. त्या अनुषंगाने कणकवली पोलीस ठाणे येथे अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर कंटेनर चालक व कंटेनरचा गुन्हा घडल्यापासून कणकवली पोलीस ठाण्याचे पथक हे शोध घेत होते. अखेर सीसीटीव्ही कॅमेरे व इतर तांत्रिक तपासातून कंटेनर निष्पन्न करून कणकवली पोलीस ठाण्याचे एक पथक हे मुंबई येथे जाऊन कंटेनरचालक व कंटेनर यांच्याविषयी माहिती घेऊन आज कंटेनर चालक व कंटेनर ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणले आहे.