
कणकवली : कनकनगर येथे लोकांनी रेल्वेपुलाच्या खाली अस्ताव्यस्त टाकलेल्या कचऱ्यामुळे गाई, गुरे, कुत्रे, तिथे येतात आणि या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरवत असतात. या कचऱ्यामुळे वाहनांना अडचण निर्माण करतात कुत्र्यांमुळे गुरांमुळे तेथे अपघातही होतात यावर कणकवली नगरपंचायतीच्या प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकात संताप व्यक्त होतोय. शिवाजीनगर येथे सुद्धा असाच रस्ता कचऱ्यावर टाकल्याने येताना जाताना पादचारी, वाहने यांना त्रास होतो. नागरिकांकडून या बाबत संताप व्यक्त होतोय. यावर योग्य ती नगरपंचायतीने कारवाई करावी अशी मागणी कनकनगर आणि शिवाजीनगर येथील रहिवाशी यांनी केली आहे.