कणकवली उड्डाण पुलाखाली लावलेल्या वाहनांवर होणार कारवाई..?

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 27, 2023 19:39 PM
views 670  views

कणकवली :  कणकवली उड्डाण पुलाखाली गेले काही महिन्यांपासून ट्रक, डंपर, टेम्पो,जेसिबी कार अशी विविध वाहने व अवजड वाहने अनाधिकृत पार्किंग करण्यात आली आहेत. त्यातील पार्क केलेला एक डंपर शुक्रवारी रात्री ११ वाजता चोरीला गेला आहे. त्यामुळे कणकवली पोलीस सतर्क झाले असून अनाधिकृत पार्किंग केलेल्या या अवजड वाहनांवर कारवाई करण्याचे संकेत पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिले आहेत.

महामार्ग प्राधिकरणाकडून काही दिवसापूर्वी उड्डाणपुलाखाली लावण्यात आलेल्या अवैध गाड्यांवर कारवाई करणार असल्याची जनजागृती महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आली होती पण अद्याप पर्यंत त्यांच्याकडून कोणतीच कारवाई झाली नाही. 

त्यानंतर  डंपर चोरीच्या घटनेनंतर  बेकायदेशीर वाहने लावलेली संबंधित मालकांनी आपली वाहने काढून वैयक्तिक पार्किंगच्या जागेमध्ये लावावीत.अन्यथा वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊन संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.