
देवगड : कर्नाटक मलपी नौकेवर विजयदुर्ग समोरील १८ वावात अनधिकृतरीत्या मासेमारी केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. विजयदुर्ग समोरील १८ वावात अनधिकृतरित्या मासेमारी करणाऱ्या मलपी कर्नाटक येथील नौकेवर महाराष्ट्र शासन द मत्स्य व्यवसाय विभागाच्या शीतल गस्तीनौकेने कारवाई करून ताब्यात घेतले आहे. व देवगड येथील बंदरात आणन्यात आले आहे.
महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम १९८१ सुधारित अध्यादेश मुख्य अधिनियमाचे कलम १५(१) अन्वये विजयदुर्ग समोरील १८ वावात अनधिकृतरित्या मासेमारी करणाऱ्या मलपी कर्नाटक येथील नौकेवर महाराष्ट्र शासन द मत्स्य व्यवसाय विभागाच्या शीतल गस्तीनौकेने कारवाई करून ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणले आहे.
ही घटना शनिवारी पहाटे ४.३० च्या सुमारास विजयदुर्ग समोरील समुद्रात घडली. मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र शासन मत्स्य व्यवसाय विभागाची शितल ही गस्ती नौका मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी, सागर सुरक्षा रक्षक व पोलीस यांच्या सहकार्याने गस्त घालत असताना मलपी कर्नाटक येथील नौका मालक देरिन प्रशांत यांच्या मालकीची जलदुर्गा- २(IND/KA/02/MM/5938) ही मासेमारी नौका विजयदुर्ग नजीकच्या १८ वावाच्या अंतरात मासेमारी करीत असताना आढळून आली .सागरी जलधीक्षेत्रात नियमांचा भंग करून मासेमारी करणाऱ्या या नौके वर मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी पार्थ तावडे, यांच्या उपस्थितीत पोलीस प्रशासनाचे पोलीस प्रवीण त्रिबके यांच्या समवेत सुरक्षा रक्षक संतोष ठुकरुल, धाकोजी खवळे, योगेश फाटक, अल्पेश नेसवणकर, अमित बांदकर, स्वप्नील सावजी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
महाराष्ट्र शासनाचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नाम.नितेश राणे यांनी आपल्या मंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागामार्फत मलपी कर्नाटक येथील मासेमारी करणाऱ्या पाचव्या नौकेवर ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत मासेमारी नोकरीवरील सौंदाळे, राणे, बांगडा, बळा, महाकुल, कोळंबी या प्रकारची मासळी ताब्यात घेण्यात आली. तिचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य परवाना अधिकारी यांनी देऊन त्या लिलावा नंतर पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
या कारवाईत मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, सहाय्यक आयुक्त महेश देवरे, प्रादेशिक उपायुक्त कोकण विभाग श्री भादुले, सहाय्यक आयुक्त कुवेस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी पार्थ तावडे यांनी ही कारवाई केली आहे.