वाळू डंपर वाहतुकीवर देवगड तहसीलदारांची कारवाई

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 28, 2023 17:04 PM
views 836  views

देवगड : देवगड तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी आर. जे. पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वाळूच्या ओव्हरलोड डंपर वाहतुकीवर कारवाई इळये पाठथरसडा येथे करण्यात आली आहे. देवगड इळये पाठथरसडा येथे आज पहाटे 4.30 वा. 4 वाळूच्या डंपर वर कारवाई करण्यात आली आहे. देवगड येथील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता ओव्हरलोड तसेच भरधाव वेगातील वाहनांना प्रतिबंध करण्याची गरज होती. तसेच जसे अपघात भविष्यात होऊ नयेत, यासाठी उपाययोजनाही करण्याची गरज आहे.

मालवण तालुक्यातील कालावल वांयगणी येथील खाडीतून देवगड येथे मोठ्या प्रमाणावर अवैध्य रित्या वाळूची वाहतूक केली जाते . या गाड्या वाळू भरण्यासाठी जात असताना भरधाव वेगात असतात.त्यामुळे याला पोलीस, महसुल व आरटीओ विभागाने पायबंद घालण्याची गरज होती.याबाबत प्रशासनाकडूनही तातडीने कार्यवाही झाल्याचे शनीवारच्या पहाटे 4.30 च्या कारवाईत दिसून येत आहे.

इळये पाठथर सडा येथे चार डंपर अवैध्यरीतीने वाळूची वाहतूक करत आढळून आलेअसताना पहाटे 4.30 वा.अडवून ताब्यात घेण्यात आले आहेत.ही वाहने कालावल येथून वाळू घेऊन देवगड इळये पाठथरसडा च्या दिशेने वाळू वाहतूक ओव्हरलोड करत येत असल्याचे महसूल विभाग यांच्या निदर्शनास आले असून महसूल विभागने याची गंभीर दखल घेऊन देवगडचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रमेश पवार यांनी या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे वाळू वाहतूक करीत असलेले डंपर देवगड तहसीलदार परिसरात उभे करून ठेवण्यात आले होते. रमेश पवार यांच्या उपस्थितीत,दहिबाव तलाठी नाडे, यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.