
कणकवली : जे एस डब्ल्यू या नामांकित कंपनीचा लोगोचा वापर करून बनावट पत्रे बनवून विक्री केल्याप्रकरणी त्या कंपनीच्या नियुक्त केलेल्या ई आय टी आर प्रायव्हेट लिमिटेड सलग्न JSW मुंबई एजन्सीने बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास कणकवली शहरात लगतच्या दुकानदारावर कारवाई केली.
या कारवाईसाठी कणकवली पोलिसांची मदत घेण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत त्या दुकानदारावर कॉपीराईट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाई मध्ये त्या दुकानदाराकडून सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे जे एस डब्ल्यू कंपनीचा लोगो असलेले बनावटी पत्रे जप्त करण्यात आले.