LIVE UPDATES

कणकवली पुलाखालील‌ वाहनांवर पुन्हा कारवाई

आरटीओ व कणकवली पोलिसांची संयुक्त कारवाई
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 17, 2025 23:01 PM
views 149  views

कणकवली : कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर आरटीओ व कणकवली पोलिसांनी मंगळवारी देखील दुपारी २ सुमारास कारवाईसत्र राबविले. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे कारवाईसत्र राबविण्यात आले. अर्थातच येथील शिवाजी महाराज चौकानजीक पुलाखाली वाहने लावलेल्या वाहनधारकांनी आपापली वाहने तेथून हटवली. साहजिकच पुलाखालील जागा‌ मोकळी झाली होती.


पालकमंत्री नितेश राणे यांनी येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच शहर आढावा बैठक घेतली होती. यात मंत्री राणे यांनी उड्डाणपुलाखाली जागेतील नेहमीच पार्किंग केलेली वाहने तात्काळ हटविण्याचे आदेश आरटीओ व पोलिसांना दिले होते. त्यानंतर आरटीओ व  कणकवली पोलिसांनी शनिवारी कारवाईसत्र राबविले होते.त्यावेळी वाहन चालकांनी उड्डाणपुलाखाली पार्क केलेली वाहने स्वत:हून हलवली होती. मात्र हेच कारवाईसत्र पुन्हा राबविण्यात येणार असल्याचे आरटीओ व पोलासांकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी हे कारवाईसत्र राबविण्यात आले.