नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवेमध्ये अभिनयाचे धडे

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 05, 2023 17:32 PM
views 146  views

कणकवली: आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे मध्ये माता अनुसया प्रॉडक्शन मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 3 दिवसीय  अभिनय  कार्यशाळेचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर, अॅड.सागर तळेकर,तसेच परवेझ पटेल व मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई उपस्थित होते.

या कार्यशाळेचे मार्गदर्शकप्रवीणकुमार भारदे व हरेश मयेकर यांचे स्वागत शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देवून केले.या कार्यशाळेत आज हास्य आणि करुण रसाची निष्पत्ती आणि यांचा अभिनयातील महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले या अभिनय कार्यशाळेत राक्षस,चेटकीण,जोकर धम्माल सेशन असणार आहेत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व  विकास आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमाचे निवेदन सहाय्यक शिक्षिका सोनाली पाटील यांनी केले.