
कणकणवी : तालुक्यातील कुंभवडे गावामध्ये दिनांक 22/3/2023 रोजी आरोपी आयसीन आंन्तोन डिसोजा यांने त्यांचा सख्खा भाउ स्टॅनी याला रात्री 10. 45 च्या सुमारास स्टॅनी घरी आल्यानंतर स्टॅनीने जेवण काय आहे असे तक्रारदार आई मार्टिना हिला विचारले व ती झोपायला रुम मध्ये गेली काही वेळानंतर मार्टिना हिला किचनमधुन भांडणाचा आवाज आला असता ती धावत किचनमध्ये गेली. तिथे आरोपी आयसीन व मयत स्टॅनी हा होता त्यावेळी आयसीनने स्टॅनीच्या पोटामध्ये चाकु मारुन बाहेर काढला त्यामुळे स्टॅनीच्या पोटातुन रक्त आले व स्टॅनी जागीच मयत झाला अशी प्रत्यक्ष घटना पाहणारी आई हिने आपल्या मोठया मुलाच्या विरुध्द लहान भाउ स्टॅनी याचा चाकु पोटात मारुन खुन केला म्हणुन तक्रार देण्यात आई मार्टिना हिने दिलेली होती.
या केसमध्ये दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर सदर केसची सुनावणी हि दिनांक 6/11/2024 रोजी पासुन सुरु करण्यात आलेली होती. सदर केसमध्ये सरकार पक्षाच्या वतीने ऐकुन 7 साक्षीदार तपासण्यात आलेले होते. सरकार पक्षाच्यावतीने सदर केस शाबीत करण्याच्या दृष्टीने सरकार पक्षाचा मुख्य साक्षीदार आरोपीची आई मार्टिना ही जी प्रत्यक्ष साक्षीदार होती तसेच वैदयकिय पुरावा याकरिता डॉ. निलेश कांदे तर सदर केसचा तपास करणारे तपासिक अधिकारी पोलीस निरिक्षक अनिल जाधव व अन्य साक्षीदार यांची साक्ष सदरकामी नोंदविण्यात आलेली होती.
याकामी सरकार पक्षाने तपासलेले साक्षीदार यांनी उलटतपासादरम्यान आरोपी विधिज्ञ अॅड स्वप्नील कोलगांवकर यांनी घेतलेली उलटतपासणी यामध्ये सरकार पक्षाचे साक्षीदार यांनी सरकार पक्षाची केस सत्यतेच्या पलिकडे आहे हि बाब संशय निर्माण करणारी ठरली. त्यामध्ये साक्षीदार यांनी दिलेली साक्ष यामध्ये मार्टिना घरात असते आणि केवळ बघ्याची भुमिका घेते तसेच तपासकामा दरम्यान सापडलेला चाकु कसा मोडला कोणी मोडला त्यामागचे कारण चाकु रक्ताने माखलेला आढळुन येत नाही. चाकु मयत यांच्या छातीत जी जख्म झाली ती कशी झाली याबाबत संशय निर्माण मे. न्यायालयासमोर उलटपासामध्ये करण्यात आला.
मे. कोटासमोर सरकार पक्षाच्यावतीने जो युक्तीवाद मांडण्यात आला त्यामध्ये तो शिक्षेस अगर आरोपी यांने गुन्हा कसा केला यावर भर देण्यात आला व मे. कोर्टाकडेच आरोपीला जास्तीत जास्त शिक्षेची मागणी करण्यात आली. याउलट आरोपीच्या वतीने युक्तीवाद करताना अॅड. स्वप्नील कोलगंावकर यांनी सरकार पक्षाने आरोपी हेतू, त्याचा उददेश, त्यामागची त्याची तयारी काय होती हि बाब मे. कोर्टासमोर आणलेली नाही. आरोपी यांचा गुन्हात कसा सहभाग नाही याबाबत जे जप्त करण्यात आलेले हत्यार हे संशयास्पद दिसुन येते तसेच आरोपीच्या अंगावर असणारे कपडे याला रक्त आहे असा एकही साक्षीदार सांगत नाही. तर मग रक्त कसे आले. आईची तक्रार पोटात चाकु मारला मग जख्म छातीत कशी सापडुन आली तसेच चाकुने वार झाला तर मग चाकु रक्ताने माखलेला का नाही. अशा वेगवेगळया मुदयावर युक्तीवाद करण्यात आला तसेच तपासीक अंमलदार यांनी मे. कोर्टासमोर सत्य आणण्याचा प्रयत्न केलेला नाही तसेच सरकार पक्ष हा केवळ केस कशी शाबीत करता येईल यादृष्टीने तपासकामातील उणिवा कशा भरुन काढता येतील व गुन्हा कशाप्रकारे शाबीत करण्याचा अशक्य प्रयत्न करत आहे असा युक्तीवाद केला.
सरकार पक्षाने तपासलेले साक्षीदार व आरोपीच्या वतीने घेण्यात आलेला उलटतपास व करण्यात आलेला युक्तीवाद यातुन संशय मे. न्यायालयासमोर निर्माण झाला व सरकार पक्ष संशयाच्या पलिकडे जावुन केस शाबीत करु न शकल्यामुळे आरोपीची सबळ पुराव्या अभावी मे. जिल्हा न्यायालयाचे सत्र न्यायाधीश यांनी मुक्तता केलेली आहे. याकामी आरोपीच्या वतीने अॅड. स्वप्नील बबन कोलगांवकर यांनी काम पाहीले.