
वैभववाडी : आचिर्णे येथील रासाई देवीचा जत्रोत्सव ६ जानेवारीला होत आहे. यानिमित्त रक्तदान, नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रासाई देवीच्या मंदिरात जत्रेच्या दिवशी सकाळी ९ ते २ या वेळेत हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, एस. एस. पी. एम. हॉस्पिटल पडवे आणि आर्यन ऑप्टिशियन, वैभववाडी यांच्या सहयोगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आचिर्णे गावातील व परिसरातील रुग्ण व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विजय रावराणे ७९७७३२४९९४, शेखर रावराणे ८६६९०८२४२६, सुशील रावराणे ९०७५९३२१०६, संतोष रावराणे ९५७९६१७४१९, स्वप्नील दर्डे ८३०८५८४६२३ यांच्याशी संपर्क साधावा.