ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत कोळब कातवड प्राथमिक शाळेचे यश

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 10, 2024 14:50 PM
views 234  views

मालवण : ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळंब कातवड शाळेचे ३ पैकी ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कु. वेदराज अंकुश कणेरकर, इयत्ता- दुसरी याने १०० पैकी ९८ गुण प्राप्त करत गोल्ड मेडल मिळवून जिल्हयात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर ऑल इंडिया रँकमध्ये तो २९ वा आला. तसेच कु. सुनंदा आनंद धुरी इयत्ता दुसरी -८८ हिने ब्रॉझ मेडल पटकावले. आणि कु. रिमा अभिजित शृंगारे -६३ गुण मिळविले, या यशाबद्दल कोळंब केंद्रप्रमुख श्रीकृष्णा बागवे, शाळा व्यवस्थापन समिती कोळंब कातवड आणि शालेय शिक्षक यांनी अभिनंदन केले.