आचरा ग्रामपंचायत निवडणुक | सरपंच पदासाठी ७ उमेदवारी अर्ज

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 20, 2023 20:16 PM
views 201  views

मालवण : आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी ७ तर सदस्य पदासाठी ३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागातून देण्यात आली.

आचरा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर उबाठा गट, शिंदे गट, भाजपकडून इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत सरपंच पदासाठी ७ तर सदस्य पदासाठी ३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर, याच दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असून चिन्हही वाटप केले जाणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० यावेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.