अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता

Edited by: विनायक गावस
Published on: May 23, 2023 14:35 PM
views 93  views

सावंतवाडी : अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लगट करण्याचा प्रयत्न करुन तिच्यावर लैंगिक आत्याचार केल्याचा प्रकार कळणे दोडामार्ग येथे घडला होता. त्याप्रकरणी दिपेश देवेंद्र सावंत रा. डबिवाडी,कळणे,दोडामार्ग याच्या विरुद्ध दोडामार्ग पोलिसठाण्यात भा.द.वी. कलम ३५४ (अ),३५४(ड),५०९,५०४,५०६ सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण आधि.२०१२ चे कलम ८,१०,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर आरोपी याला दि. ०१/०५/२०२३ रोजी अटक करण्यात आलेलेली होती.त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली होती, आरोपी याचेतर्फे ॲड. अनिल निरवडेकर यांनी जामिन अर्ज दाखल केलेला होता. त्याकामी ओरोस येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांनी ॲड. निरवडेकर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी याचा जामिन अर्ज मंजूर केला असून. आरोपीयाची रक्कम रु. २५०००/- च्या जामिनावर मोकळीक करण्याचा आदेश पारीत केलेला आहे.याप्रकरणी ॲड. अनिल निरवडेकर व ॲड. गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.