ACB ने अटक केलेल्या आरोपींची सशर्त जामीनावर सुटका

Edited by:
Published on: February 11, 2025 16:47 PM
views 209  views

सिंधुदुर्ग : लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम ७, ७अ व १२ अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपी उर्मिला उमेश यादव व मणिक भानुदास सांगळे यांची सशर्त जामिनावर सुटका करण्यात आलीय. 

अति. सत्र न्यायाधीश, व्ही. एस. देशमुख यांनी अटींवर प्रत्येकी रक्कम रु. ५०,०००/- च्या जातमुचलक्यावर व जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश केला. आरोपीतर्फे अॅड. अजित भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. मिहीर भणगे, अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनिल मालवणकर, अॅड. तेजाली भणगे व अॅड. आशुतोष कुळकर्णी यांनी काम पाहिले.