कुडाळात डेंग्युची साथ ; प्रशासन अलर्ट

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 08, 2023 13:49 PM
views 295  views

कुडाळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची ग्रामपंचायत स्तरावर यादी करा, एखादा चाकरमानी आजारी असल्यास त्याची माहिती नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना द्या, व साथ रोग प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा असे आवाहन कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांनी तालुक्यात वाढनाऱ्या डेंग्यू व चिकनगुनिया रुग्णांच्या पार्श्वभूमीवर  आयोजित साथ रोग प्रतिबंधक उपाय योजना बैठकीत तहसीलदार कार्यालय येथे केले.


कुडाळ शहरासह ग्रामीण भागात मागील दोन महिन्यात ७७ रुग्ण डेंग्यू बाधित आढळल्याने कुडाळ प्रशासन अलर्ट झालं आहे. डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया  यासारख्या साथजन्य रोगांनी जिल्ह्यासह कुडाळ तालुक्यात थैमान घातल आहे. याच पार्श्वभूमीवर कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय येथे साथ रोग प्रतिबंधक उपाययोजना बैठक पार पडली.या बैठकीला कुडाळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संदेश कांबळे, कुडाळ आगार नियंत्रक संदीप पाटील , प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, उपस्थित होते.