अपघातात दुचाकीस्वार ठार

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 23, 2023 13:57 PM
views 3732  views

वैभववाडी : वेंगसर येथे झालेल्या ट्रक व दुचाकी अपघातात कासार्डे येथील प्रकाश शांताराम शेलार यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास वेंगसर घाडीवाडी येथे झाला. श्री.शेलार हे दुचाकी घेऊन आजिवलीच्यादिशेने जात होते. यादरम्यान आजिवलीहून खारेपाटणच्या दिशेने येणाऱ्या चि-याच्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात श्री. शेलार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.