कंटेनर बॅरिकेट तोडून आत घुसला

पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावला
Edited by: विनायक गांवस
Published on: September 01, 2025 14:22 PM
views 163  views

सावंतवाडी : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर तपासणी नाक्यावर ठेवण्यात आलेली बॅरिकेट तोडत थेट बांदा पोलीस तपासणी नाक्याच्या परिसरात रस्त्याच्या खाली उतरल्याने अपघात झाला. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने त्या ठिकाणी ड्युटी बजावत असलेले पोलीस कर्मचारी दत्ताराम पालकर हे थोडक्यात बचावले. मात्र, यात कोणीही जखमी झालेले नाही. ही घटना घडल्याची माहीती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कंटेनरचा मागचा भाग महामार्गावर असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. यावेळी शासकीय ठेकेदार प्रताप मूर्ती यांनी आपली क्रेन उपलब्ध करून दिल्यामुळे तात्काळ अपघातग्रस्त कंटेनर काढणे शक्य झाले. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. संबंधित कंटेनर लोखंडी प्लेट वाहतूक करत असल्याची माहिती मिळते. दरम्यान, या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात संबंधित कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती बांदा पोलीस ठाण्यातून देण्यात आली. गाडीचे ब्रेक लागले नसल्यामुळे हा अपघात घडला. 

आपण त्या ठिकाणी ड्युटी बजावत होतो. महामार्गावरून जाणा-या अन्य गाड्या तपासत असताना  अचानक हा कंटेनर आला थेट रस्त्याच्या बाजूला जावून पलटी झाला. सुदैवाने आपण बचावलो अन्यथा अनर्थ घडला असता अशी भिती श्री. पालकर यांनी व्यक्त केली.