मोटरसायकल स्लीप होऊन तरुणाचा अपघात

अधिक उपचारांसाठी गोव्यात
Edited by: विनायक गांवस
Published on: July 22, 2025 19:16 PM
views 813  views

सावंतवाडी : माजगाव गरड येथे मोटरसायकल स्लीप होऊन सौरभ मालडकर (वय २३) या युवकाचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन नाक व कानातून रक्तस्त्राव सुरू झाला. सामाजिक बांधिलकीच्या रूपा गौडर यांनी तेथील नागरिकांच्या मदतीने या युवकाला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेत मदतकार्य केले. त्या युवकावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. हा युवक गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला तात्काळ गोवा बांबोळी  येथे जाण्याचा सल्ला दिला. १०८ वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या विनंतीवरून रवी जाधव यांनी 102 ॲम्बुलन्स तत्काळ उपलब्ध करून दिली.