
सावंतवाडी : आजगाव येथे वेंगुर्ला-पणजी व सावंतवाडी-वेंगुर्ला बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात दोन्ही बसच्या चालकांसह २५ हून अधिक प्रवासी जखमी झालेत.
जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी मळेवाड आरोग्य केंद्रात तसेच शिरोडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात आज दुपारी ३.३० च्या सुमारास आजगाव डीएड कॉलेजलगत वळणावर झाला. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.