
खेड : तालुक्यातील खेड - तळे रोडवर कुडोशी नजीक दुचाकी ला मालवाहू टेम्पो ची धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज ता. १८ रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास झाला.
खेड वरून देवघर येथे जात असलेल्या (क्र. एम एच १४ जीएफ ८९२७) या दुचाकीला मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी असून त्याला श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने उपचारार्थ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.