
मंडणगड : मद्य पिवून डंपर चालवणाऱ्या बॉक्साईड मायनीगंच्या डंपर चालकाने १६ मे रोजी भिंगळोली येथे एका पादचाऱ्यास धडक दिल्याने पादचारी गंभीर रित्या जखमी झाला. या अपघातामुळे तालुक्यात बॉक्साईट वाहतूकीची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. वाहतूकीशी संबंधीत खनिकर्म, सार्वजनीक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसुल, पोलीस, व रस्तेवाहतूक नियंत्रक या संबंधीत सहा संबंधीत विभागाने स्थानीक पातळीवर वाहतूकीचे माध्यमातून सुरु असलेल्या बेकायदेशीर प्रकारांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून यामुळे शहरासह तालुक्यात याबद्दल असंतोषाचे वातावरण आहे.
तालुक्यातील नायणे ते रायगड जिल्ह्यातील करंजाणी रेल्वेस्टेशनपर्यंत होणार बॉक्साईट वाहतूकीसाठी क्षमता नसणाऱ्या दोन राज्यमार्गांचा व काम सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा वापर केला जातो. या रस्त्यांवर वाहने व रस्ता यांच्या क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक होत आहे, गौणखनिज वाहतूकीसंदर्भात संबंधीत विभागांचे निर्दशनांचे अनुपालन होत नाही, जुन्या व कालबाह्य वाहनांचा वाहतूकीसाठी वापर केला जातो अशा आशयाच्या तक्रारी सर्व विभागांकडे तालुक्यातू संस्था, सामाजीक संघटना राजकीय पक्ष व नागरीक यांनी वेळोवेळी केल्या आहेत. त्यात मद्यपी वाहचचालकांची भर पडली आहे. वाहतूक सुरु असलेल्या अंतरातील ग्रामपंचायत व स्थानीक स्वराज्य संस्था मागण्याकडे व समस्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने वर्दळीच्या ठिकाणी व वेळेत शाळामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांची रस्त्यावरुन प्रवासी वेळेत वाहतूक सुरु असु नये या माफक मागणीकडेही वाहतूक व्यवस्थापनाने वेळोवेली दुर्लक्ष केले आहे. बॉक्साईट वाहतूकीमुळे स्थानीक पातळीवर हंगामी रोजगाराची बतावणी करुन वेळ मारुन नेली जात आहे गेल्या चार वर्षापासून ही परिस्थीती असून डंपर चालक रस्त्याची विशिष्ठ्य परिस्थिती लक्षात न घेता वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन बेदरकारपणे वाहने चालवित असल्याने तालुकावासीयांना अपघाताची भिती चौवीस तास आहे. दुचाकी व लहान वाहनांना या वाहतूकीमुळे अपरिमत त्रास झालेला आहे गेल्या चार वर्षापासून तालुकावासीय हा त्रास सहन करीत आहे. प्रशानसन मात्र विविध कारणांनी गप्प बसले आहे. मायनीग डंपरमुळे झालेल्या अनेक अपघाताची नोंद व दखलही घेण्यात आलेली नाही. प्रशासन तालुक्यातील जनतेने जीव जाण्याची वाट पहात आहे का असा प्रश्न या निमीत्ताने तालुकावासीय उपस्थित करीत आहेत.