म्हैस आडवी आल्याने अपघात

सामाजिक बांधिलकीची मदत
Edited by:
Published on: December 15, 2024 11:58 AM
views 471  views

सावंतवाडी : निळेली येथे मोटर सायकलने घरी जात असताना  मळगाव ब्रिजवर म्हैस आडवी आल्याने अपघात घडला. रात्री आठ वाजता घडला. यात पती पत्नीला दुखापत झाली. 

त्या अपघातामध्ये पतीच्या तोंडाला जब्बर मार बसला. तर पत्नीला किरकोळ दुखापत झाली. हेल्मेटमुळे आपला जीव वाचला असं त्याच्या पत्नीने सांगितलं. रुग्णाला सावंतवाडी रुग्णालयामध्ये श्री.राणे यांनी आपल्या ॲम्बुलन्सने आणलं. प्राथमिक उपचारानंतरव पुढील अधिक उपचारासाठी त्यांना ओरोस येथे पाठवण्यात आले. सामाजिक बांधिलकीचे सदस्य रवी जाधव व श्री. राणे यांनी त्यांना मदत कार्य केले.