
वैभववाडी: शहरानजीक मंगळवारी रात्री झालेल्या अपघातातील जखमी रामचंद्र आकाराम रावराणे ( वय ७०)यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने एडगावावर शोककळा पसरली आहे.
भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची धडक दुचाकी बसून दुचाकी पादचाऱ्याला धडकली. हा अपघात मंगळवारी शुकनदी पुलानजीक झाला होता. यात दुचाकीवरील तरुण व पादचारी श्री रावराणे हे जखमी झाले होते. रावराणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कणकवली येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
श्री.रावराणे हे होळीकरिता गावी आले होते. मंगळवारी सायंकाळी वैभववाडी बाजारपेठेत फेरफटका मारण्यासाठी ते आले होते शहरातून घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला. शवविच्छेदन करून मृतदेह आज सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.