प्रकाश गोगटे यांच्या गाडीला अपघात

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 28, 2024 13:09 PM
views 407  views

देवगड : देवगड येथील शिरगाव राकसघाटी येथे गवारेडा आडवा आल्यामुळे माजी आमदार कै.आप्पासाहेब गोगटे यांचे चिरंजीव प्रकाश (बंड्या) गोगटे यांच्या चार चाकी गाडीचा अपघात झाला आहे. गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून ते थोडक्यात बचावले. सदरची घटना शनिवारी रात्री घडली मात्र यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश (बंड्या) गोगटे यांची गाडी देवगडच्या दिशेने येत असताना शिरगाव राकसघाटी येथे अचानक गवारेडा आडवा आल्यामुळे गाडीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.मात्र घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली अपघाताची भीषणता एवढी होती की गाडीच्या एअरबॅग ओपन झाल्यामुळे कोणालाही दुखापत न झाल्याचे समजते. मात्र, गाडीचे पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

दोन महिन्यापूर्वी देखील त्या ठिकाणी अशाच पद्धतीने गवारेडा आडवा आल्यामुळे चार चाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले होते.सातत्याने होत असलेल्या अपघातामुळे नागरिक हैराण झाले असून संबंधित गवारेड्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली असून रात्रीच्या वेळी वाहन चालकांनी राकसघाटी येथील तीव्र वळणावर वाहन सावकाश चालवावे असे आवाहन देखील ग्रामस्थांकडून केले जात आहे. याविषयी  देवगड पोलिस स्थानकात उशिरापर्यंत कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.