वागदेत गोवा बनावटीची दारु वाहतूक करणाऱ्या कारचा अपघात

पोलिसांना गाडी कोणाची ? हेच कळेना..
Edited by: उमेश बुचडे
Published on: September 29, 2023 20:59 PM
views 701  views

कणकवली :कणकवली वागदे डगळवाडी  येथे गोवा ते कणकवलीच्या दिशेने गोवा बनावटीची दारु वाहतूक करणाऱ्या बलेनो कारला शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास  झाला. अपघात होताच चालक-मालक पसार झाले. मात्र दारुने भरलेली कार अवघ्या काही मिनिटातच खाली झाली. त्यानंतर त्या ठिकाणी कणकवली पोलीस दाखल झाले. त्यांना अद्यापही कारचा मालक सापडत नाही.त्यामुळे बापरे ..पोलिसांना गाडी कोणाची ? हेच कळेना.. अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमध्ये उमटत आहे.

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. नेमका अपघात कसा झाला हे समजू शकले नाही पण गाडीचे मोठे नुकसान झाले होते. गाडीच्या दोन्ही एअर बॅग देखील ओपन झाल्या होत्या सायंकाळी आठ वाजेपर्यंत पोलिसांना ही गाडी नेमकी कोणाची हेच समजेना कारण गाडी जवळ कोणीही आढळून आले नाही किंवा कोणी जखमी अवस्थेत दिसले नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यावरून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या बलेनो कारचा वागदे डांगळवाडी येथे अपघात झाला या गाडीमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे काही बॉक्स पोलिसांना सापडून आले. चालक आणि अन्य त्याच्यासोबत असणारा साथीदार या  दोघांनीही गाडी टाकून पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले यावेळी पोलीस उपनिरीक्षक शरद देठे वाहतूक पोलीस विनोद चव्हाण आणि राजेश पाटील हे उपस्थित होते

अशा अवैध दारू वाहतुकीचा पोलिसांनी छडा लावणे गरजेचे आहे कारण सध्या राजरोजपणे ही दारू वाहतूक होत आहे काही दिवसापूर्वी खारेपाट्यांमध्ये देखील पोलिसांनी दबा धरून अवैद्य दारू वाहतुकीवर कारवाई केली होती पण आता ही गाडी अपघात झाल्यामुळे समजले की दारू वाहतूक करणारे गाडी आहे त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर सर्रास होणाऱ्या या अवैध दारूवर पोलिसांकडून धडक मोहीम हाती घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे