
दोडामार्ग : तिलारी घाटात मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात झाला आहे. टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघातात वाहक व चालक सुखरूप बचावले असून टेम्पोचे मात्र नुकसान झाले आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
कोल्हापूरहून ताडपत्री घेऊन एक महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पो तिलारी घाट मार्गे गोव्याच्या दिशेने जात होता. घाट उतरत असताना टेम्पोचे ब्रेक निकामी झाले. परिणमी टेम्पो नियंत्रणा बाहेर गेला. टेम्पो रस्त्या लगतच्या कठड्याला आदळला व रस्त्यावर पलटी झाला. मार्गस्थ होणाऱ्या काहींनी बचावकार्य केले.