पाट तिठा येथे अपघात

डंपर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू
Edited by:
Published on: March 16, 2025 12:20 PM
views 1226  views

वेंगुर्ले : पाट तिठ्यावर आज रविवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात डंपर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळतात निवती पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. निवती येथील कु. मनस्वी मेतर असे त्या शालेय विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचा उदया दहावीचा शेवटचा पेपर होता. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच निवती पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.