
कुडाळ : मुंबई - गोवा महामार्गावर बोलेरो पिक - अप आणि चारचाकी यांच्यात धडक बसून अपघात झाला. या अपघातात चारचाकीच्या मागील डाव्या बाजूचे चाक पंक्चर झाले असून या धडकेत कारच्या मागील डाव्या बाजूचे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोलेरो पिक - अप गाडी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. यावेळी बोलेरो पिक - अप आर.एस.एन. हॉटेलकडे आली असता रस्ता क्रॉस करणाऱ्या कारला बोलेरो पिकपची मागच्या डाव्या बाजूच्या दरवाजाला जोरदार धडक बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की कार गोल गिरकी घेऊन विरुद्ध दिशेला तोंड करून उभी राहिली. या अपघातात कारच्या डाव्या बाजूचे नुकसान झाले असून मागच्या डाव्या बाजूचे चाक पंक्चर झाले आहे. तर बोलेरो पिक - अपचे किरकोळ नुकसान झाले आहे. परंतु सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.











