
सावंतवाडी : कारीवडे - पेडवेवाडी येथे चालकाचा ताबा सुटल्याने सुमो कार पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने यातील प्रवाशांना अधिक दुखापत झाली नाही. यात प्रवास करणारे प्रवासी हे बेळगाव - खानापुर येथील होते. यातील आठ प्रवाशांना किरकोळ दुखापत झालीय. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. घटना आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास धोकादायक वळणार ही घटना घडली. तेथून जाणाऱ्या सायकलिंग टीमसह नागरिकांनी बचाव कार्यासाठी धाव घेतली.