आंबोली घाटात अपघात ; तिघे जखमी !

Edited by: विनायक गांवस
Published on: April 02, 2024 11:30 AM
views 1255  views

सावंतवाडी : आंबोली घाटात आज दुपारी नाणपानी येथे एक अज्ञात ट्रक व मोटासायकलमध्ये अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील तीन जण गंभीर जखमी झाले.

जीलानी मेहबूब शेख 27, अजाण इस्ताक शेख 26, नुर अहमद सनदी 30 अशी गंभीर जखमींची नाव‌ आहेत. त्यांना उपचाराकरिता उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे खासगी वाहनाने दाखल करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार यांनी मदतकार्य केले.