
आरोंदा : आरोंदा भटपावणी येथे बुधवारी रात्री जनावरांची रूग्णवाहीका व बाईक स्वारामध्ये झालेल्या अपघातात बाईक चालक संदीप उत्तम नाईक (रा. शिरोडा) यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी शिरोडा रूण्यालयात नेले असता त्यांना डाॅक्टरांनी मयत झाल्याचे घोषीत केले.
पाईप लाईन टाकण्यासाठी खोदकाम चालू असून हे खोदकाम करतानाची काही माती रस्त्यावरच राहते त्यामुळे बाईक स्लीप होउन पडु शकतात व वाहतुकीला ही अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरीकांना कोणतीही अडचण होईल, असे काम करू नये. जेणेकरून काम संपल्यानंतर रस्त्यावर राहणारी माती बाजुला टाकावी, अशी मागणी येथील रहीवाशांमधुन होत आहे. अपघाताची माहिती मिळताच आरोंदा दुरक्षेत्राचे हवालदार केरकर व पोलीस कर्मचारी भागीरथ मौळे, प्रदीप नाईक लगेच घटनास्थळी दाखल झाले.