पोलीस कर्मचारी राजा राणे यांच्या दुचाकीला अपघात !

Edited by: विनायक गावस
Published on: December 13, 2023 18:32 PM
views 714  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील पोलीस कर्मचारी राजा राणे यांच्या दुचाकीला सावंतवाडी जेल परिसरात अपघात झाला. यात  त्यांच्या हाताचा दोन बोटांना गंभीर दुखापत झाली आहे.


ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली असून रिक्षाची धडक दुचाकीला बसल्यामुळे हा अपघात झाला. त्यांना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी घरी जात असताना समोरून येणाऱ्या रिक्षाची धडक बसल्यान हा अपघात झाला. यावेळी येथील नागरिक प्रकाश घोगळे व ज्ञानेश्वर दळवी यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या अपघाताच वृत्त समजताच पोलीस कर्मचारी व त्यांच्या मित्रपरिवाने रूग्णालयात धाव घेतली.