दुचाकी अपघातात गंभीर जखमी तरुणाच निधन

Edited by: दिपेश परब
Published on: August 23, 2023 23:21 PM
views 516  views

वेंगुर्ले : दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले वेंगुर्ला -पेंडूर येथील शेतकरी हरेश सदाशिव गावडे (४५) या तरुणाचे उपचारापूर्वीच निधन झाले. हा अपघात बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तळवडे, मातोंड मार्गावरील डॉ. कांडरकर हॉस्पिटल नजीक घडला. त्यांच्या आकस्मित अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

    याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात मयत यांचे चुलत भाऊ अमर गावडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पेंडूर येथील हरेश गावडे हे आज बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीने तळवडे येथे बाजारात जात असताना दुचाकीवरून अचानक रस्त्यावर पडून गंभीर जखमी अवस्थेत पडलेले होते. यावेळी घटनास्थळी नातेवाईक व ग्रामस्थांनी धाव घेतली व त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी हरेश गावडे यांना तपासून मयत घोषित केले. या दुर्दैवी घटनेची माहिती गावात समजतात अनेकांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. रुग्णालयात पोलिस हवालदार महेश जाधव व आबा पीरणकर यांनी पंचनामा केला असून  विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.