
सावंतवाडी : नेमळे येथे मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात विनायक बाबली पांगम(वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कुडाळहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडीने कामावरून चालत घरी परतत असताना पांगम यांना मागून ठोकर देत सुमारे २० ते २५ फूट फरफटत नेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ठोकर देणारा वाहन चालक फरार झाला आहे. माजी उपसरपंच विक्रम पांगम यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. एक मुलगा सहावीत शिकत असून दुसरा अंगणवाडीत आहे. ठोकर देऊन वाहनचालक फरार झाल्यानं ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रस्त्याला बॅरिकेट नसल्यानं व हायवे प्राधिकरणाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याच ग्रामस्थांच म्हणणं आहे.