
दोडामार्ग : मेढे येथे खडी वाहतूक करणारा डंपर पलट झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. यात चालक जखमी झाला असून डंपरचे मोठे नुकसान झाले आहे. मेढे येथे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. यासाठी रविवारी एक डंपर खडी घेऊन येत होता. दरम्यान चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटले व रस्त्यावरच पलटी झाला. यात चालकाच्या हाताला दुखापत झाली. डंपर मधील खडी रस्त्यावर पसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जेसीबी ला पाचारण करून रस्त्यावरील खडी बाजूला करण्यात आली. अपघातात डंपरचे मोठे नुकसान झाले आहे.










