दुचाकीची महिलेला ठोकर

Edited by: विनायक गांवस
Published on: June 25, 2025 21:16 PM
views 1062  views

सावंतवाडी : आंबोली येथील कामतवाडी येथे स्वामी समर्थ मठासमोर हायवेवर दुचाकीने  येथील रस्ता ओलांडताना एका महिलेला ठोकरल्याने अपघात झाला. यात दुचाकी चालक आणि कामतवाडी येथील महिला जयश्री विजय गावडे या जखमी झाल्यात. येथील पोलीस हवालदार दीपक शिंदे आणि रामदास जाधव यांनी त्यांना आरोग्य केंद्रात दाखल केले. यांनतर पंचनामा केला.ही घटना सायंकाळी सहा वाजता घडली.