
सावंतवाडी : धाकोरेतून वेंगुर्लेच्या दिशेने चिरे घेऊन जाणाऱ्या डंपरचे अचानक ब्रेक निकामी झाल्यामुळे धाकोरे बानघाटीत भीषण अपघात झाला. या अपघातात डंपरच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने डंपर चालक सुखरूपपणे डंपरमधून बाहेर आला.
बानघाटीत अतीशय तीव्र उतार असल्याने आणि डंपर चे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने डंपर घाटीतील खड्ड्यात जाऊन जोरात आढळला. यात डंपरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने यात चालकाला कोणतीही इजा न होता चालक दरवाज्यातून बाहेर पडला.