
देवगड : बैलाला धडकून टेंबवली भेकरटाकानजीकअपघात झालेल्या तळेबाजार येथील जखमी वाहन चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.हि घटना शुक्रवारी २४ जाणे रोजी दुपारी १२.३० वा. दरम्यान घडली देवगड तालुक्यातील तळेबाजारहून देवगडच्या दिशेने दुचाकीने जात असताना अचानक रस्त्यामध्ये आलेल्या बैलाला धडकून तळेबाजार बाजारपेठ येथील भिकशेठ हरी पारकर (७६, मूळ रा. वरेरी) हे गंभीर जखमी झाले होते.
त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.हा अपघात शुक्रवारी दुपारी १२.३० वा. च्या सुमारास टेंबवली भेकरटाकानजीक घडला.अधिक मिळालेल्या माहिती नुसार, देवगड तळेबाजार बाजारपेठ येथील भिकशेठ पारकर हे कामानिमित्त आपल्या ताब्यातील दुचाकीने शुक्रवारी दुपारी तळेबाजारहून देवगडच्या दिशेने जात होते. टेंबवली भेकरटाकानजीक ते आले असता त्यांचा दुचाकी वरील ताबा सुटून दुचाकी अचानक रस्त्यामध्ये आलेल्या बैलाला धडकली.यात ते रस्त्यावर फेकले जात गंभीर रित्या जखमी झाले होते.त्यांना तात्काळ जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्यामुळे प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.